बनावट मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणार

4,919 बीएलओ 51.10 लाख मतदारांची पडताळणी करणार
नाशिक :प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मतदार यादी पडताळणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेले 4,919 बूथ लेव्हल अधिकारी सुमारे 51 लाख 10 हजार मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. या प्रक्रियेदरम्यान एखादा बनावट किंवा अपात्र मतदार आढळल्यास त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल.
जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट किंवा अपात्र मतदारांची नावे मतदार यादीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करत आहेत. या प्रक्रियेत मतदारांना दोन अर्ज (प्रपत्रे) दिली जात आहेत. त्यापैकी एक अर्ज मतदाराने भरून स्वतःकडे ठेवायचा असून, दुसरा अर्ज भरून बीएलओकडे जमा करायचा आहे.
पडताळणीदरम्यान बीएलओ मतदाराचे ओळखपत्र, पत्ता, नाव, जन्मतारीख तसेच इतर आवश्यक माहितीची तपासणी व पडताळणी करत आहेत. तपासणीमध्ये जर एखादा बनावट किंवा अपात्र मतदार आढळला, तर त्याचे नाव तात्काळ मतदार यादीतून वगळण्याची कारवाई केली जाईल.
आगामी निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकचे निवडणूक प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, मतदार यादी शुद्ध, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 4,919 बीएलओ मतदार यादीचे पुनरावलोकन करत आहेत. ही मोहीम सुमारे एक महिना चालणार आहे. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून अद्ययावत मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.
– मधुमती सरदेसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Names of fake voters will be removed from the electoral roll.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *