एक तू मित्र कर आरशासारखा!

‘फ्रेंडशिप डे’चा उत्साह; मैत्रीचे बंध झाले दृढ

नाशिक : प्रतिनिधी
काही मित्र आयुष्यात भेटतात तर काही मित्रांमध्ये आयुष्य! दोस्ती कभी स्पेशल लोगो से नही होती, जिनसे दोस्ती हो जाती है वही लोग स्पेशल बन जाते है.. अशा मेसेजसह मैत्रीवरील शायरी, कविता एकमेकांना शेअर करत, तसेच स्टेटसला ठेवत मैत्री दिन साजरा केला. फ्रेंडशिप डेच्या मध्यरात्रीपासूनच सोशल मीडियावर फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणारे मेसेज शेअर करण्यात येत होते. तर अनेकांनी मैत्रीसोबतचे फोटो स्टेटसला शेअर करत मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणताही मोठा सण, राजकीय, सामाजिक मोठी घटना असो, त्याचा सोशल मीडियावर तात्काळ परिणाम जाणवतो. त्यामुळेच मैत्री दिनाच्या निमित्तानेही सोशल मीडियावर मैत्रीचा बहर आला होता. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून फ्रेंडशिप बँड बांधत. तर अनेकांनी मित्र-मैत्रिणींना फोन कॉल्स, मेसेज, व्हिडिओ कॉल या माध्यमातून शुभेच्छा देत मैत्रीचे ॠणानुबंध अधिक घट्ट केले. आयुष्यात निःस्वार्थ भावनेने जपले जाणारे नाते मैत्रीचे असल्याने प्रत्येकालाच आपल्याला जिवलग मित्राला भेटणे शक्य नसल्याने सोशल मीडियाचा आधार ठरला. परिणामी, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने
व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील स्टेटस, मेसेज, स्टोरीज मैत्रीचे महत्त्व विशद करणार्‍या होत्या.

पावसाळी ट्रीप अन् हॉटेलिंगला पसंती
रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी आपल्या जीवलग मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटत फ्रेंडशिप डे साजरा केला. त्यामुळे शहरातील हॉटेल्स, कॉफी शॉपवर तरुणाईची गर्दी झाली होती. तर अनेकांनी फ्रेंडशिप डेचा मुहूर्त साधत मित्र-मैत्रिणींसोबत पावसाळी ट्रीप, ट्रेकिंगला जाण्यास पसंती दिली.

सोशल माध्यमावर मेसेजचा पाऊस
सोशल मीडियातील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमातून फ्रेंडशिप डेचा उत्साह दिसून आला. सोशल माध्यमातून मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छांचा पाऊस पडला. मेसेज, व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘सेल्फी’ विथ ‘फ्रेंड’
‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणीसोबत ‘सेल्फी’ ‘सोशल मीडिया‘वर ‘पोस्ट’ तरुणाईकडून पोस्ट करण्यात आले. ‘फ्रेंडशिप डे’ला ‘सेल्फीज्’चा ‘ऑनलाइन’ माध्यमावर अक्षरश: पाऊस पडला.

A friend like a mirror!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *