पुराच्या पाण्याने चाणखणबाबा बंधारा तुडुंब

पांगरीतील 85 टक्के शेती सिंचनाखाली; शनिवारी कोकाटे यांच्या हस्ते जलपूजन

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी शिवारातील चाणखणबाबा बंधारा देव नदीच्या पुराच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला यश आले असून, पांगरी परिसरातील सुमारे 80 ते 85 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. बंधारा भरल्याने परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बंधारा तुडुंब भरल्याच्या पार्श्वभूमीवर पांगरीतील लाभार्थी शेतकर्‍यांच्या वतीने शनिवारी (दि. 22) सायंकाळी चार वाजता बंधार्‍याच्या पायथ्याशी जलपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे.
या सोहळ्यास परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी संचालक कैलास निरगुडे, माजी सरपंच संपत पगार, ज्ञानेश्वर पांगारकर, सोमनाथ निरगुडे, संदीप पांगारकर, शांताराम निरगुडे, सोमनाथ पेशवे, मारुती निरगुडे, मधुकर निरगुडे, बाळासाहेब निरगुडे, सोमा निरगुडे, आबा पांगारकर आणि संदीप पगार यांनी केले आहे.
खोपडी परिसरातून वाहणार्‍या देव नदीचे पाणी यापूर्वी मोठ्या प्रमाणात खाली वाहून जात होते. हे पाणी अडवून पूर्व भागातील शेती सिंचनाखाली आणण्याच्या संकल्पनेतून चाणखणबाबा बंधारा साकारण्यात आला. राज्याचे माजी कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंधार्‍यात पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध
झाली आहे.

Chankhanbaba Weir Filled to the Brim with Floodwaters

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *