जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

– विष्णूपंत गायखे अध्यक्ष,
दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या आयुष्यात सात ते आठ वेळेस मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. पाचव्या सहाव्या शतकात चीनचा जगप्रसिद्ध प्रवासी हू एन तसंघ कुंभमेळ्याची महती ऐकून नाशिक जिल्ह्यात आला होता. म्हणतात त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावात छोट्या स्वरूपात कुंभ करत असे तेथे भेट देऊन त्याने चीनमधून आणलेली घंटा येथील मंदिरास भेट दिलेली होती. ती आजही आपण पाहू शकतो.
कुंभमेळा उत्सव जगप्रसिद्ध असून आपणा सर्वांचेच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पहिला कुंभ तर नाशिक रोड येथून पायीच गेलो होतो. तर एका कुंभात पंचवटी येथे अचानक गर्दीत गोंधळ होऊन चेंगराचेंगरीचा अनुभव देखील घेतला आहे. या दिवसांमध्ये नाशिक शहर त्रंबकेश्वर गावामध्ये मोठा बदल होतो. सर्वत्र प्रचंड मोठी गर्दी धार्मिक वातावरण देशभरातून आलेले श्रद्धावान त्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले हिमालयापासून ठिकठिकाणी साधू त्यांचे आखाडे त्यांच्या अनोख्या परंपरा याचं भारी आकर्षण सर्वांनाच असते.
या कुंभ उत्सवात नाशिक त्र्यंबकेश्वरांचे स्वरूप बदलते यानिमित्ताने शहरातील अंतर्गत रस्ते पंचवटी परिसर गोदावरी काठ नव नवीन बस स्टॅन्ड निर्माण होत असतात. सर्व भागातून पंचवटीकडे जाणार्‍या रस्त्यांच्या संख्येत दरवेळेस वाढत्या लोकसंख्येमुळे वाढ होत असते. या दिवसात नाशिकमध्ये लाखोच्या संख्येने बाहेरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. लॉजिंग खाण्यापिण्याचे हॉटेल शेअर बस वाहतूक व्यवस्था विविध देशांनी देशभरातून नाशिककडे येणार्‍या विशेष रेल्वे प्रवासी गाड्या खासगी वाहने अगदी काही प्रमाणात विमान प्रवासी यात मोठी वाढ होऊन यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसाइक यांचे व्यवसायात वाढ होत असते. अर्थात त्याचा आर्थिक लाभ या घटकांना होतच असतो. हे कुणालाही मान्य करावे लागेल. याच सोबतीने नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पर्यायाने कृषी क्षेत्रात लाभ कसा होऊ शकेल या दृष्टीने आता शिक्षित तरुण शेतकरी यांनी लाभ घेतला पाहिजे.बारा महिने भरपूर पाणीसाठा असलेला आपला जिल्हा लाखोच्या संख्येने येथे येणारी माणसं यांना शुद्ध व ताजे पाणी देण्याकरता कमी खर्चात छोटे-मोठे बिस्लरी प्रकल्प निर्माण होऊ शकतात. पाणी आपल्या शेतात आपण धरणाजवळ राहतो,नदीकाठी राहतो,म्हणजे त्याकरता आवश्यक असा कच्चामाल आपल्या उशा पायथ्याशी आहे, जमीन आपली याकरिता आवश्यक विज उपलब्ध होऊ शकेल.फक्त थोडेसे प्रशिक्षण व काम करण्याची जिद्द असल्यास हजारो केंद्रांमार्फत लाखो बिसलरी पाण्याच्या बाटल्या तरुण शेतकरी उत्पादन करू शकतो.नाहीतर हेच पाणी खूप लांबून विविध ठिकाणाहून येऊन येथे मार्केटमध्ये प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल करू शकेल.आपण फक्त पहातच बसायचं आहे काय? याच दिवसात भाजीपाला दूध त्याची प्रचंड मागणी असेल. ठीक ठिकाणी नाशिक कृषी विभागाकडून शहरात जागांची मागणी करून शेतकर्‍यांनी विक्री केंद्र सुरू करावेत, या व्यवसायाला तर फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसेल. आपल्या जिल्ह्यात फळेही उत्तम दर्जाचेही निर्माण होतात. पेरू द्राक्ष डाळिंब इतकेच काय कांदा,मुळा,गाजर,डांगरांना या दिवसात मोठी मागणी असेल. तर याचा थोडासा अभ्यास करून तरुण शेतकर्‍यांनी एकत्र येऊन नियोजन केल्यास त्याचा लाभ मिळू शकेल.
औरंगाबाद रोड, पुणे रोड, त्रंबक रोड,आग्रा रोड चौदिशांनी नाशिककडे येणार्‍या रोड लगत शेतकरी वर्गाने स्टॉल सुरू केल्यास निश्चितच आपल्या सर्वांचे आर्थिक कुंभात भर पडेल यात शंका नाही. केंद्र सरकार,राज्य सरकार महापालिकेचे प्रशासकांनी या दृष्टीने नियोजन आराखडा केल्या तर याचा फायदा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात होऊ शकेल.हजारोच्या संख्येने चहुदिशांनी वाहने नाशिक त्रंबकेश्वर शहरात येतील त्या वाहनांना मुख्य शहरांपासून दूर अंतरावर पार्किंगची गरज असेल, त्याकरिता रस्त्यालगत अनेकांच्या पडीत जमिनी आहेत, त्यांनी खाजगी वाहनतळाची निर्मिती करून मा.कलेक्टर नाशिक यांच्याशी चर्चा करून काम करण्याची तयारी दर्शविल्यास शासनस्तरावर देखील धोरण ठरविता येईल त्यातूनही शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळेल.

Acceleration in the agricultural sector of the district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *