मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नशामुक्त महाराष्ट्रासाठी अनेक पावले गेल्या काही काळात उचलली आहेत. अशामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.1) दुपारी 12 वाजता बैठक पार पडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच बैठकीत पुणे जिल्ह्यातील कुकडे पाटबंधारे प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा शेकडो शेतकर्यांना फायदा होणार आहे. गृहविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग या विभागांतर्गतही काही निर्णय घेण्यात आले आहेत.
♦ नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण जाहीर. (गृहविभाग)
♦ शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपाहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)
♦ सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाकादरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
♦ कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता.