3100 हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारला ‘इको-फ्रेंडली बाप्पा’

वाघ शिक्षण संस्थेत कार्यशाळा

नाशिक : प्रतिनिधी
के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन, स्माइल व स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज (स्माइल) व स्पीनच सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती अर्थात इको-फ्रेंडली गणेशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांच्या 3100 हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावत बाप्पा साकारले. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे त्यांनी साकारलेले शाडू मातीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नगरसेवक सागर लामखेडे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, विश्वस्त शकुंतलाताई वाघ, संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, समन्वयक डॉ. भूषण कर्डिले उपस्थित होते. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा र्‍हास, त्याचप्रमाणे बाजारात विकल्या जाणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी, या हेतूने हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती अजिंक्य वाघ यांनी दिली. सूत्रसंचालन सारंग नाईक यांनी केले. कार्यशाळेेसाठी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी
परिश्रम घेतले.

आयुक्तांची उपस्थिती
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आपल्या मुलांसह स्वत: पूर्णवेळ उपस्थित राहून शाडू मातीपासून इको फ्रेंडली सुबक बाप्पा साकारला.

Over 3,100 students created an ‘eco-friendly Bappa’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *