नाशिक : जिल्हा रूग्णालयात चक्क तीन बोगस डॉक्टर आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये तीन महिला स्टेथोस्कोप हातात घेऊन संशयास्पदरित्या फिरत होत्या. त्यांची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने कर्मचार्यांनी त्यांची चौकशी केली असता ही बाब उघड झाली.