संकलन : अश्विनी पांडे
आपल्या वैयक्तिक आयुष्याचा अनुभव लेखनात असेल तर लेखन उत्तम आणि प्रभावी होतं. दमलेल्या बाबाची कहाणी हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझं आणि माझ्या मुलीचं नातं गाण्यातून उलगडलं आहे. वडील आणि मुलीचे नातं भावनिक असतं. ज्या वेळी या गीताचे लेखन केले तेव्हा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांत व्यस्त असायचो. त्यामुळे मुलीला वेळ देता येत नव्हता. गाण्यात वर्णन केलेली स्थिती मी अनुभवलेली आहे. त्यामुळे हे गाणे सहजपणे लिहिलेला माझा अनुभव आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने इतकेच सांगावेसे वाटते की, मुलगी आणि वडिलांचे नातं वेगळं असतं. मुली वडिलांशी आयुष्यभर भावनिकरीत्या जोडलेल्या असतात. वडील हे मुलींचे प्रेरणास्थान असतात. मला मुलगी आहे हे मी माझं भाग्य समजतो. जगातल्या सगळ्या मुलींना आणि वडिलांना ‘फादर्स डे’च्या मनापासून शुभेच्छा!
– संदीप खरे