परिसराची तपासणी
नाशिक : प्रतिनिधी
अंबड परिसरारातील विनोद मडैया या झारखंडमधील सतरावर्षीय युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार असल्याने या अहवालकडे लक्ष लागले आहे.
या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित परिसराची पाहणी केली. या पाहणीत डासांची उत्पत्तिस्थळे आढळली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच परिसरात डेंग्यूसदृश ताप किंवा तत्सम आजाराची लक्षणे असलेली अन्य व्यक्ती आढळून आलेली नसल्याची माहितीही देण्यात आली आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील तपासणी सुरूच ठेवण्यात येणार आहे. पाथर्डी फाटा परिसरात यापूर्वीही एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अंबडमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर डेंग्यूचा प्रश्न पुन्हा उद्भवला आहे. संबंधित परिसरात पाहणी केली असता डासांची उत्पत्तिस्थळे आढळून आली नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, विनोद मडैया हा मूळचा झारखंडमधील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याला ताप आला. प्रकृती खालावल्याने त्याला प्रथम कामटवाडे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याच्या भावाने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
Health department on alert following youth’s death