डोंगराळेतील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा; आ. सुहास अण्णा कांदे यांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

नाशिक: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून, या निर्णयाचे आमदार सुहास कांदे यांनी स्वागत केले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून हा गंभीर विषय शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. चिमुकलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून अवघ्या तीन आठवड्यांत दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या पोलीस यंत्रणेचे विशेष अभिनंदन. तसेच या प्रकरणात न्यायप्रक्रियेला गती मिळावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी शासनस्तरावर झालेल्या पाठपुराव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री
सुनेत्राताई पवार तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

निष्पाप चिमुकलीला न्याय मिळणे ही संपूर्ण समाजाची अपेक्षा होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये. अशा अमानुष गुन्ह्यांतील दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.

 

चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्यापासून ते न्यायप्रक्रियेपर्यंत झालेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. प्रत्येक मुलगी सुरक्षित असावी, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.

— आ. सुहास अण्णा कांदे

Death sentence for the accused in the murder case of a little girl from Dongrale; MLA Suhas Anna Kande welcomes the court’s verdict.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *