कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले असून, त्यांना पुन्हा घ्यावे, तसेच महापालिकेने हा ठेका रद्द करावा. मालेगाव महापालिकेने कामगारांच्या पिळवणुकीच्या आरोपांमुळे कंपनीचा ठेका रद्द केला. असे असतानाही नाशिक महापालिकेने 2026 मधील नव्या निविदा प्रक्रियेत याच कंपनीला पुन्हा ठेका दिल्याचा आरोप कामगारांनी केला. याबाबत महापालिकेसमोर शुक्रवारी (दि.16) जोरदार निदर्शने करण्यात आली.
सफाई कामगारांची कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना मानधनावर सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी निदर्शने करीत मनपा आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनासह बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कामगारांच्या निवेदनानुसार, नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी 8 जुलै 2025 रोजी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून वॉटरग्रेस कंपनीविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीयांनी कंपनीच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

कामगारांकडून सात हजारांची वसुली
महापालिकेने या प्रकरणाची 1 ऑगस्ट 2020 ते 2026 या कालावधीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, कंपनीकडून कामगारांना पूर्ण मूळ वेतन न देता, वेतनाचा परतावा झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्येक कामगाराकडून पाच ते सात हजार रुपये जबरदस्तीने जमा करून घेतल्याचा आरोप निवेदनात या कर्मचार्‍यांनी केला आहे.

Contract workers stage demonstration in front of the municipal corporation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *