संस्कृतीचा द्वेष करणारा राष्ट्राचा शत्रू : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : प्रतिनिधी
राजधानी दिल्लीतील आयपी एक्स्टेंशन येथे विजयादशमीच्या भव्य सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवरून विरोधकांवर थेट निशाणा साधला. राष्ट्राच्या सन्मानाला धक्का लावणार्‍या, समाजात फूट पाडणार्‍या आणि भारतीय संस्कृतीचा द्वेष करणार्‍या शक्ती या राष्ट्राच्या शत्रू आहेत, असे मोदी म्हणाले. आज देशाचा प्रत्येक कोपरा श्रीरामांच्या भावनेने भारलेला आहे, रामलीला ही केवळ परंपरा नाही तर जुलूम आणि दहशतीच्या अंताचे आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे, असेही
त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुसर्‍या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीतील इंद्रप्रस्थ (आयपी एक्स्टेंशन) येथील उत्सव मैदानावर दशहरा साजरा केला.
यावेळी मोदी म्हणाले, दसरा हा भारताच्या प्राण ऊर्जेचा सण आहे. हा केवळ रावणावरील विजय नाही, तर जुलूम आणि दहशतवादाच्या अंताचा प्रतीक आहे. रामराज्य म्हणजे समान संधी आणि लोककल्याण असून, विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाकडे आपण वाटचाल करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लाल किल्ल्याजवळील लव-कुश रामलीला मैदानावर दहन सोहळ्यात हजेरी लावली.

One who hates culture is an enemy of the nation: Prime Minister Modi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *