मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा
मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे . मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे . मंगळवारी ( २८ जून ) रिलायन्स उद्योग समूहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली . यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . रिलायन्स संचालक मंडळाने आकाश अंबानी यांच्याशिवाय इतरही काही नियुक्तीचे निर्णय घेतले आहेत . यानुसार , पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली . ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे . रमिंदर सिंग गुजराल व के . व्ही . चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली .