मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयात सुविधा
नाशिक : प्रतिनिधी
स्वंतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहेत . या अभियाना अंतर्गत दिव्यांगांसाठी संगणकीय कार्यप्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देणेकामी नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयामध्ये स्वंतत्र नोंदणी कक्ष सुरु करण्यात आला आहे . ४० व ४० टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनी संगणकीय कार्यप्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र करीता नोंदणी करणे व त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे . नाशिक महानगरपालिकेद्वारे ४० किंवा ४० टक्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या ज्या व्यक्तींनी अद्याप पावेतो ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र मिळालेले नाही , किंवा त्याकरीता नोंदणी केलेली नाही , अशा दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी करावी . अशा प्रकारे नोंदणी करणेकरीता नाशिक महानगरपालिकेने सहाही विभागीय कार्यालयामध्ये नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे . तरी ज्या दिव्यागांना अद्याप पावेतो संगणकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र मिळणेकरिता नोंदणी करणे शक्य झालेले नाही त्यांना त्यांचे जवळच्या नाशिक मनपाच्या नोंदणी केंद्रावर त्यांची आवश्यक ती कागदपत्र घेऊन नोंदणी करुन घेता येईल व ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणालीद्वारे दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र ( UDID ) त्यांना त्यांचे जवळच्या नाशिक मनपाच्या नोंदणी केंद्रावर त्यांची आवश्यक ती कागदपत्र घेऊन नोंदणी करुन घेता येईल.
हेही वाचा : दिव्यांगांना पालिकेकडून वर्षभरात १ कोटीचे अर्थसहाय्य