पावसाळ्यामुळे नर्सरीत रोपांच्या विक्रीत वाढ

शोभिवंत फुलझाडांच्या लागवडीकडे नागरिकांचा कल
नाशिक : अश्‍विनी पांडे
पावसाच्या आगमनानंतर पर्यावरण प्रेमीसह अनेक जण वृक्षाची लागवड करत असतात. पावसाळ्यात लावलेली रोपे टिकत असल्याने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येते. परिणामी नर्सरीमध्ये विविध वृक्षांची रोपे खरेदीसाठी नागरिक नर्सरीमध्ये गर्दी करत आहेत.
काही दिवसापासून शहरात पावसाच्या सरी कोसळत असल्याने रोपांची लागवड करणे सोपे गेले. पावसाला सुरूवात झाल्याने नर्सरी व्यवसायला उभारी मिळाली आहे. दरवर्षी ज्या प्रमाणे विक्री होते यावर्षीही रोपांची तेवढीच विक्री झाली. पावसाळ्यात रोपांची मागणी असते. तसेच लागवड केलेले रोप पावसाळ्यात बहरतात. रोपवाटिकेत मजूर आणि अधिकारी सातत्याने नर्सरी वाढविण्यासाठी परिश्रम घेतात. आता पाऊस कमी असल्यास ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. या वर्षी फळ झाडांच्या आणि फुल झाडांच्या रोपांना जास्त मागणी आहे. रोपांच्या वाढीनुसार रोपांची किंमत ठरवली जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या प्रजातीवरून रोपांची किमंत ठरवली जाते. 60 रूपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत रोपांची किमंत आहे. फळ आणि फुलांच्या रोपाबरोबर औषधी झाडांना मागणी आहे. सध्या वड, सप्तपर्णी, लिंब, हिरडा, पिंपळ, जारोल, सीता-अशोक, जांभूळ, सेंद्री, करंजइ, आंबा, फणस, करंबळ, पिवळा चाफा, रिटा, आवळा अर्जुन, शिका, सीमारुबा, कदंब, बेल, बकुळ, मोहगणी, गोरखचिंच, नरक्या अशा औषधी झाडांना मागणी आहे. गुलाब, मोगरा, चाफा, जाई, जुई या रोपांना कायमच मागणी असते. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर रोपांच्या मागणीत अधिक वाढ होईल,असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *