शहरात पावसाची संततधार

 

नाशिक : प्रतिनिधी

शहरात  दिवसभर पावसाची संततधार  सुरू होती.   मंगळवारी पावसाचा  जोर ओसरला होता. मात्र काल सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप  सुरू होती. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर गोदावरीचा पुर अद्याप ओसरला नाही.

शहरासह जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे नद्या, नाले, तळे, ओढे ओसंडून वाहत आहेत. धरण क्षेत्राच्या पानलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठयात वाढ झाली आहेत.  नद्यांना पुर आल्याने जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . तर अनेकांनी पुरात आपला जीव गमवावा लागला आहे.    अवघ्या सहा दिवसात  झालेल्या जोरदार पावसामुळे  जुन महिन्याचा बॅकलॉक पावसाने भरून काढला आहे. तसेच 11 ते 14 जुलै या कालावधीत जिल्हयाला रेड अलर्ट  देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार  शहरासह जिल्ह्यात  पावसाची दिवसभर  संततधार  सुरू होती.  तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार  पाऊस सुरू होता. मुसळधार  पावसामुळे जन जीवन विस्कळीत  झाले आहे. तर भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यासमोर  समोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

 

पर्यटनाला बहर

जिल्ह्यातील  होत असलेल्या पावसामुळे पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. मात्र  धबधबे , नदी लगत जात पर्यटकांकडून  करण्यात येत असलेल्या हुल्लबाजीमुळे पोलिस प्रशासनासमोर पर्यटकांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.

 

महापुर पाहण्यासाठी गर्दी

गोदावरीला आलेला महापुर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तर होळकर पुलावर वाहनधारकांकडून वाहने थांबवत पुर पाहण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

 

दुर्घटनांचे सत्र

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना होत आहेत .अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. तर काही ठिकाणी   घरात पाणी शिरून घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खचत असल्याने अपघात होत आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *