मंगळवार, १९ जुलै २०२२,
आषाढ कृष्णपक्ष, षष्ठी/सप्तमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे ” आज दुपारी १.४३ पर्यंत ‘अतिगंड’ योग आहे, त्यानंतर ‘सुकर्मा’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा, चंद्र नक्षत्र : मीन
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वाहन सुख मिळेल. खर्चात वाढ संभवते. प्रतिष्ठा सांभाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. व्यवसायातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरीष्ठची मर्जी राहील. स्पर्धेत यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आप्तांची भेट होईल. मित्रांच्या अपेक्षा वाढतील. शिक्षकांना उत्तम दिवस आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) महत्वाचे करार आज नकोत. मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. ध्यानधारणा करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल. उत्तम आर्थिक प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती संबंधित खुशखबर मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल. पाळीव प्राण्यांची माया अनुभवाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढेल. सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. लेखन चमकेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कलाकारांना यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. चंद्र गुरू युतीमुळे मानसिक सौख्य अनुभवाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. आरोग्य मात्र सांभाळा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी