नांदूर नाका : वार्ताहर
पंचवटी येथील मार्केट यार्ड गेट समोरील वडाचे झाड कोसळले आहे. हे झाड रिक्षावर कोसळले .यावेळी रिक्षात काही प्रवासी आणि भाजीपाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच रिक्षाचे नुकसान झाले आहे.
झाड कोसळल्यानंतर परिसरात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
यावेळी झाड पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.