टोल नाक्यावर आ. कांदेंचा काढता पाय

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील सत्तानाट्यानंतर नांदगावचे आमदार सुहास कांदे हे काल मनमाड येथे मेळावा घेण्यासाठी जात असताना त्यांचा कांदे यांना पिंपळगाव टोल नाक्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून घोषणाबाजी केली. कांदे हे त्यांच्या कारच्या खाली उतरताच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गद्दार गद्दार म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कांदे यांना कारमध्ये बसवून मनमाडकडे रवाना करण्यात आले. टोलनाक्यावर जमलेल्या हजारो युवा सेनेच्या आक्रमकतेमुळे कांदेंनी येथून काढता पाय घेतल्याने कटुप्रसंग टळला.शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसनेचे आमदार आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. ते शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पिंपळगाव बसवंत येथील तमाम शिवसैनिक आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर उभे होते. तेव्हा बंडखोर आमदार सुहास कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोल नाक्यावर आला. कांदे हे आपल्या वाहनातून बाहेर आले मात्र टोल नाक्यावर जमा झालेल्या तमाम शिवसैनिकांनी आ.कांदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाड्यांचा ताफा शिवसैनिकांनी पिंपळगाव टोलनाक्याजवळ अडवला मात्र पोलिसांच्या मदतीने सुहास कांदे यांना सुरक्षितपणे रवाना करून देण्यात आले.यावेळी येथे जमलेल्या शिवसैनिकांनी कांदे यांना बघताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कांदे गाडीत बसून मनमाडच्या दिशेने रवाना झाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *