नाशिक : प्रतिनिधी
शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले आदित्य ठाकरे यांनी काल काळाराम मंदिरात जावून प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात जाताना त्यांनी पावसामुळे हातात छत्री घेतली. यावेळी महंत सुधीरदास पुजारी हे त्यांच्यासोबत होते. आदित्य ठाकरे यांनी स्वत: हाती छत्री घेत महंत पुजारी यांनाही सोबत घेतले. त्यामुळे ठाकरे यांचा हा साधेपणा चर्चेचा विषय ठरला. महंत पुजारी यांनी ठाकरे यांनी छत्री घेतलेला फोटो फेसबुकवर पोस्ट केला. त्यामुळे काल दिवसभर या छत्री धरलेल्या फोटोची मोठी चर्चा संपूर्ण शहरात होती.