पाण्याच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये बुडवून बायकोचा खून
मालेगाव : शहरात नवर्याने बायकोचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ ही घटना घडली आहे. येथे राहणारे अब्दुल वफा अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला खून केल्याची घटना घडली आहे. रमजान पुरा भागात खान कुटूंबिय राहते. या नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. संशयित अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करीत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांत नेहमी भांडणे होत असत. दि. २१ जुलै रोजी देखील रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय घेत मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. या प्रकरणी रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुल खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.