धामणगांव येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

धामणगांव। : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथील कातकरी समाजातील २६ वर्षीय गरोदर महिलेचा शुक्रवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयत महिलेचे यमुना वाघ असे महिलेचे नाव असून तिला ५ वर्षाची मुलगी आहे, ती आठ महिन्याची गर्भवती होती. घोटी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास करत आहे.
धामणगांव येथील सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी भरण्यासाठी ही महिला गेली होती. मात्र ती अचानक विहिरीत पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. ह्या घटनेची माहिती येथील उपसरपंच शिवाजी गाढवे, तुकाराम कोंडूळे,धोंडीराम गुंजाळ यांनी घोटी पोलिसांना तात्काळ कळविली.घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. यमुना वाघ ही भाऊ सुनील त्र्यंबक मुकणे यांच्याकडे राहत होती. जीवरक्षक गोविंद तुपे यांनी बुडालेल्या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मा.जि. सदस्य बाळासाहेब गाढवे यांनी याकामी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देऊन मृत्यूदेह घोटी येथे शवविच्छेदना साठी पाठविण्यात येऊन पुढील तपास घोटी पो. स्टेशन करत आहे.

गावच्या सार्वजनिक विहिरीत महिलेचा मृत्यू झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीचा सध्यातरी कोणीही वापर करू नये असे गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने शिवाजी गाढवे यांनी आवाहन केले असून या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने परिसराच्या वतीने हळू व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *