आदित्य ठाकरेंचा पाटणमध्ये हल्लाबोल

 

पाटण ( सातारा ) : महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचं राजकारण सुरू आहे , ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे . नागरिकांची एकजूट , हिंदुत्वाची एकजूट , शिसैनिकांची एकजूट , तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे . पण हे कोणाला शक्य होणार नाही . बंधू – भगिनींनो गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका , असं आवाहन करताना आपलं प्रेम आणि आशीर्वाद ठाकरे कुटुंबावर असूद्यात , अशी साद आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या हजारो उपस्थितांना घातली . शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे . काल त्यांची यात्रा शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदार शंभुराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात दाखल झाली . यावेळी हजारो शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं . त्यांच्या स्वागताला जमलेली गर्दी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती . उपस्थितांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरे यांनीही दणकेबाज भाषण केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *