नवीदिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता उद्या सुनावणी होणार आहे. आज तब्बल दोन तास दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य ठरविणार्या या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाकडून ऍड. हरिष साळवी, महेश जेठमलानी, ठाकरेंच्या बाजूने अभिषेक मनुसिंगवी, कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. उद्या या संघर्षावर होणार्या सुनावणीत काय होते? याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. दहाव्या सूचीनुसार बंडखोर हे पक्षावर दावा करु शकत नाही. असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे आज न्यायालयात केला.