लासलगाव : प्रतिनिधी
लासलगाव येथे रेडिमेड कापड दुकानाला आग लागल्याने लाखांचे नुकसान झाले आहे.
लासलगाव एस टी डेपो शेजारी सकाळी साडे सात च्या दरम्यान रेडिमेड कापड दुकानाला आग लागल्याची घटना घडली.आग लागली या वेळी दुकान बंद होते.दुकानातून आगीचे लोट आणि धूर मोठया प्रमाणात बाहेर येत असल्याचे दिसल्यावर स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली.
आग विझविण्यासाठी लासलगाव येथे अग्निशमन दलाची गाडी नसल्याने परिसरातील पाणी पुरवठा करणारे ट्रॅक्टरने आगीवर नियंत्रण आणले.या आगीत आजू बाजुच्या दोन दुकानांचे सुध्दा आगीत मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.यात शिवनेरी चहाची दुकान व शेतकरी मेन्स वेअर दुकानातील नवीन रेडिमेड कपड्याचा माल जळून खाक झाला आहे.ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मदत केली.तसेच या परिसरातील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अजुनही अस्पष्टच आहे.या घटनेची माहिती कळताच पोलीस कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी दखल झाले.
या वेळी परिसरात नागरिकांची गर्दी केली होती.