श्वानाच्या अंत्यविधीला लोटला अख्खा गाव

आवडता बाराशे नामक श्वानाच्या मृत्यूने हळहळले ग्रामस्थ
पळसे : प्रतिनिधी
पळसे गावात कोणाचाही अंत्यविधी असो, रक्षाविसर्जन, दशक्रिया विधी असो तो गावातील भावकीतला असल्याप्रमाणे प्रत्येक विधीकरता माणसासोबत चालत दारणातीरी हजर असे. गावातील हरीनाम सप्ताहातील कार्यक्रमास. कुणाच्याही दारी दिवसा तो हक्काने दिसत असे. त्याला कुणाच्याही घरी मुक्त प्रवेश असे. तरुणपिढी त्याच्यासाठी आवर्जून बिस्किटे देत. तर कुणी म्हातारी त्याला आठवणीने चतकोर भाकरी काढून ठेवत.
आज पहाटे त्याचे दु:खद निधन झाले. समस्त पळसेकरांनी हळहळ व्यक्त केली. गावाच्या वेशीपासुन त्याची मिरवणूक काढुन माणसांच्या प्रमाणे अंत्यविधी केला. “बाराशेला” पाहण्याकरता लेखक उत्तमराव कांबळे तसेच पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणाहून माणसे खास या माणुसवेड्या कुत्र्याला बघायला येऊन गेलेत.
“बाराशेच” पुढील पिढीकरीता गावात उचित स्मारक करण्याचा निर्णय ग्रामस्थांचे शोकसभेत विष्णुपंत गायखे यांनी ग्रामस्थांच्या सुचनेनुसार घेतला. याप्रसंगी उपसरपंच दिलीप गायधनी, विलास आगळे, राजेंद्र गायधनी, दिपक गायधनी, तानाजीराव गायधनी,मधुकर पगार, सुनील गायधनी, नवनाथ गायधनी, माधव गायधनी, भारत गायधनी, पो. पाटील सुनील गायधनी, संजय गायधनी, बाबुराव तुपे, रवी टावरे, बबनराव थेटे, निवृत्ती गायधनी, भास्कर गायधनी, मोतीराम तिदमे, राजाराम गायधनी, भाऊसाहेब जाधव, आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *