मविप्रसाठी दोन दिवसांत 258 अर्जाची विक्री

नाशिक ः प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत पहिल्या दिवशी 146 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्यानंतर काल दुसर्‍या दिवशी 127 अर्जाची विक्री झाली. दोन दिवसांत 258 अर्जांची विक्री झाली.
अर्ज घेऊन जाणार्‍यांची संख्या पाहता यावेळी इच्छुकांचे उदंड पीक आले आहे.
सिन्नरचे आ.माणिकराव कोकाटे यांच्यासह हेमंत वाजे, डॉ सुनील ढिकले, विद्यमान अध्यक्ष तुषार शेवाळे, सुभाष कारे,विजय कारे, डॉ.आत्माराम कुंभार्डे आणि इतर आजी माजी संचालकांनी अर्ज नेले आहेत. मविप्र निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शुक्रवारपासून अर्ज विक्रीला सुरुवात झाली. यामध्ये आजी माजी संचालकांसह राजकीय तसेच इतर क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींचा समावेश असल्याने निवडणुकीचा चांगलाच धुरळा उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज विक्री 11 ऑगस्टपर्यत आहे.
पात्र उमेदवारांची यादी 16 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.माघारीसाठी उमेदवारांना 19 ऑगस्टपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून कोण उमेदवार आहेत. हे समजणार आहे. मतदान 28 ऑगस्टला आणि मतमोजणी 29 ऑगस्टला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *