लासलगाव येथे कामायनी एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत

लासलगाव प्रतिनिधी

कोविड -19 मुळे 2 वर्षा पासून कामायनी एक्स्प्रेस चा (11072 Up – 11071 Down) थांबा लासलगाव व नांदगाव स्टेशन साठी रद्द झाला होता.केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून कामायनी एक्सप्रेस चा थांबा 14 ऑगस्ट 2022 पासून या दोन्ही रेल्वे स्टेशनवर पूर्ववत होत असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी दिली आहे. कामायनी एक्सप्रेस च्या लासलगाव व नांदगाव रेल्वे स्टेशन वरील थांब्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी, विद्यार्थी,नोकरदार वर्ग,व्यापारी घटक व सर्वांचाच फायदा होणार आहे व सर्वाना दिलासा मिळणार आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंधेला हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे प्रवाशांनी अभिनंदन केले आहे.रविवारी 14 तारखेला संध्याकाळी 5.40 वाजता डॉ भारती पवार कामायणी एक्सप्रेस ला VC द्वारे फ्लॅगिंग करणार असून सर्वांनी लासलगाव रेल्वे स्टेशन येथे उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णा जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *