सातपूर येथे सिटी लिंक बस एकमेकांना धडकून अपघात
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अशोक नगर भागातील सावरक नगर येथे बारदान फाट्याच्या दिशेने जाणारी बस निमाणीच्या दिशेने जाणार्या बसला धडकून सिटी लिंक बसचा अपघात झाला आहे. यात दोन्ही बसचे नुकसान झाले असून दहा ते अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये पन्नासहून अधिक प्रवासी होते.