उमराळे बुद्रुक : वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, नाशिक पासून 20 ते 21 अंतरावर असलेले वडे बुद्रुक परिसरातील राशेगाव जांबुटके पेठ येथे भूकंपाचे धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले आहे. मागील 17 ऑगस्ट रोजी नाशिक तालुक्यातील दरी मानोरी दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक दिंडोरी मडकीजाम हातनोरे, वनारवाडी, निळवंडी, तळेगाव पाढे आदी ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. काल पुन्हा रात्री भूकंपाचे धक्के बसल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.