राशी भविष्य

सोमवार, २२ ऑगस्ट २०२२.

श्रावण कृष्ण एकादशी, वर्षा ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज चांगला दिवस, *स्मार्त एकादशी* आहे” शिवामूठ – जवस. अमृत सकाळी ७.४१ पर्यंत. आज ‘वज्र’ योग.

चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा

मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने कराल.

वृषभ:- शब्दास मान मिळेल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना लाभ होतील. खर्चात वाढ होऊ शकते.

मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. अनपेक्षित घटना घडतील. शब्द जपून वापरा.

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.

कन्या:- शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील.

तुळ:- प्रवास घडेल. जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील.

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मन:शांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील.

कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.

मीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *