चंदन हार

चंदन हार
हा एक पारंपरिक भारतीय हार आहे जो महाराष्ट्र, गुजरात आणि हैदराबादमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गुजराती लोकांकडे अगदी आवर्जून केला जाणारा हा प्रकार म्हणजे चंदनहार. ज्याप्रमाणे आपल्याकडे ठुशी किंवा कोल्हापुरी साज ठरलेला असतो अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या येथे हा हार करण्याची पद्धत आहे.

थोडीशी जाळीसारखी डिझाईन असलेले हे चंदन हार दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसतात. तुम्हाला त्याच त्याच टिपिकल डिझाइन्स आवडत नसतील तर तुम्ही चंदनहार देखील घेऊ शकता. अगदी कितीतरी तोळ्यापासून ते एक ग्रॅमपर्यंत तुम्हाला हा हार मिळतो.

गळ्यालगत एखादा दागिना घातल्यानंतर तुम्ही त्याखालोखाल काही मोठा दागिना घालण्याचा विचार करत असाल तर हा हार तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

 

– अंजली देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *