पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी एचपीटीत प्रवेश प्रक्रिया सुरू

पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी एचपीटीत प्रवेश प्रक्रिया सुरू

 

नाशिक:- जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (एमए जेएमसी) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र आहे.

पदवीप्राप्त आणि पदवी परीक्षेची अंतिम वर्षाची (सत्राची) परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या

https://forms.gle/H3RSpdLWRaw3wZ8j9

या लिंकवर नोंदणी करुन अर्ज भरावा, असे आव्हान प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आणि विभागाच्या समन्वयक डॉ. वृन्दा भार्गवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६५७३५४४५ आणि ८०८७९४६५०२ या मोबाइल क्रमांकांवर तसेच ०२५३२३११४५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विषयाचा अभ्यासक्रम सन १९८३-८४ पासून एचपीटी महाविद्यालयात सुरू असून, हा अभ्यासक्रम सुरू करणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांबरोबरच मीडियातील पत्रकार या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपलब्ध असतात. हा अभ्यासक्रम पूर्ण करुन या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मीडियात करिअर करत आहेत. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *