नाशकात प्राप्तिकर विभागाचे छापे

लोहोणेर : प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील गत काळाच्या व सध्या भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वसंतराव दादा पाटील साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकलेला असून पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या डी व्ही पी ग्रुपच्या वतीच्या माध्यमातून धाराशिव समूहाने सुमारे २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील कारखान्यावर आज आयकर विभागाने सकाळच्या सुमारास अचानक छापा टाकला. तब्बल पाच ते सहा तासापासून वसाका कार्यस्थळावरील मुख्य कार्यालयात याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे. मात्र याबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आलेली आहे. कारखान्याच्या आवारात कडे – कोठ पोलीस बंदोबस्त असून कोणालाही मुख्य कार्यालयात प्रवेश दिला जात नाही आहे. या चौकशीच्या अंती नेमके काय समोर येणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक कारखान्याच्या मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहे. आणि याबाबत मुख्य कार्यालयात सखोल चौकशी सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात आत येण्या जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू सुरू असून चौकशी नंतर काय निष्पन्न होणार त्याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *