धक्कादायक : लष्करी हद्दीत ड्रोन च्या घिरट्या
संवेदनशील परिसर असल्याने खळबळ
नाशिकरोड : प्रतिनिधी
गांधीनगर येथील लष्करी हद्दीतील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल या परिसरात ड्रोन उडताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा ड्रोन कोणाचा आहे याबाबत पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे
नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या लष्करी परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी असताना सुद्धा सदर परिसरात ड्रोन उडत असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या नंतर ड्रोन फायरिंग करून उडवून टाका असा आदेश वरिष्ठांनी दिला. मात्र काही क्षणात सदरचा ड्रोन लष्करी हद्दीतून दिसेनासा झाला.
लष्करी हद्दीत ड्रोन उडविण्यास बंदी असताना सुद्धा सदरचा ड्रोन हा लष्करी हद्दीत कसा आला याबाबत कसून शोध घेण्यात येत आहे.
मनदीप सिंग ईश्वर सिंग या लष्करी अधिकाऱ्याने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत माहिती अशी की, दिनांक 25 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल या परिसरात ड्रोन उडत असल्याचे ड्युटी ऑपरेटर नायक जर्नल सिंग यांनी मंदिर सिंग यांना सांगितले की मेजर आशिष यांचा फोन आला होता आपल्या कॅट्स च्या हद्दीत ड्रोन उडत आहे त्यानंतर मनदीप सिंग यांनी खात्री केली असता सदरचा ड्रोन 800 फूट उंचावर फिरत आहे त्यानंत र मनदीप सिंग यांनी त्वरित बेस सिक्युरिटी ऑफिसर लेफ्ट कर्नल व्ही रावत यांना ड्रोन बाबत माहिती दिली व ते फायरिंग करून पाडण्याची परवानगी मागितली याच दरम्यान सदरचा ड्रोन हद्दीतून निघून गेला त्यानंतर मनदीप सिंग यांनी राव त्यांना तसे सांगितले असता ते म्हणाले की पुन्हा सदरचा ड्रोन दिसल्यास शूट करून काढून टाका अशा सूचना दिल्या. दरम्यान त्यानंतर मनदीप सिंग यांनी त्वरित उपनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे हे करत आहे.