मविप्र अपडेट ; दुसऱ्या फेरीअखेर ठाकरे आघाडीवर

नाशिक : प्रतिनिधी
राजकारणात कुणीच कुणाचा सदा सर्वकाळ मित्र अथवा शत्रू नसतो. काल मविप्रच्या मतमोजणीत याचा प्रत्यय आला. मविप्रच्या मतमोजणी स्थळी प्रगती पॅनलच्या नेत्या आणि सरचिटणीसपदाच्या उमेदवार नीलिमा पवार आणि विरोधी परिवर्तन पॅनलचे नेते आणि सभापतीपदाचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांची भेट झाली. त्यावेळी नीलिमा पवार यांनी क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिवसभर मतपत्रिकांची जुळवा जुळव केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. सकाळीच परिवर्तन पॅनलचे नेते नितीन ठाकरे हे मतमोजणीस्थळी ठाण मांडून आहेत. इगतपुरीच्या उमेदवाराची एक पत्रिका गायब झाल्याचे समजताच संदीप गुळवे यांनी धाव घेत मतपत्रिका गहाळ कुठे झाली? असे म्हणत जाब विचारला होता.

एका मतपत्रिकेवर शिक्कयाऐवजी हाताचा ठसा
सरचिटणीसपदाच्या एका मतपत्रिकेवर शिक्का आहे की अंगठ्याचा ठसा यावरुन गोंधळ सुरू झाला. मतपत्रिकेवर शिक्का मारलेला आहे की नेमका ठसा त्यामुळे कर्मचार्‍यांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, हा शिक्काच असल्याचा निर्वाळा निवडणूक मंडळाने दिल्याने गोंधळ मिटला. असाच प्रकार अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेतही दिसून आला.

मविप्रमध्ये हे उमेदवार आघाडीवर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी काल मतदान पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सेवक संंचालक पदासाठी संजय शिंदे हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या फेरीत 306 तर संपत काळे यांना 103 मते मिळाली

दुसऱ्या फेरीअखेर ठाकरे आघाडीवर
मविप्र निवसणुकीत दुसऱ्या फेरी अखेर सरचिटणीस पदाचे उमेदवार नितीन ठाकरे 103 मतांनी आघाडीवर आहेत, दुसऱ्या फेरीत नीलिमा पवार यांना 439 तर नितीन ठाकरे यांना 554 मते मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *