नाशिक, प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक संस्थेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये ॲड.नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी घवघवीत यश संपादन केले. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी ॲड.नितीन ठाकरे, नंदकुमार बनकर, डॉ.सयाजीराव गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा.बाळासाहेब पिंगळे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.