राशी भविष्य

सोमवार, ५ सप्टेंबर २०२२.

भाद्रपद शुक्ल नवमी/दशमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज क्षय दिवस, अदु:ख नवमी, *गौरी विसर्जन (रात्री ८.०६ पर्यंत)* दोरे घेणे आहे.

चंद्र नक्षत्र – मूळ (रात्रौ ८.०६ पर्यंत)

मेष:- दूरच्या नात्यातून लाभ होतील. जपून गुंतवणूक करा. अंदाज चुकू शकतात. मन स्थिर राहील.

वृषभ:- आत्मविश्वस कमी होईल. आरोग्यावर चांगला परिणाम करणारा दिवस आहे.

मिथुन:- जोडीदाराकडून सुख लाभेल. दिवस आनंदात जाईल. प्रेमात यश मिळेल. संशयकल्लोळ टाळा.

कर्क:- आर्थिक विकास करणारा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. अंदाज अचूक येतील.

सिंह:- संततीवर लक्ष ठेवावे लागेल. चुकीच्या संगतीचे योग आहेत. काळजी घ्या. धाडसी निर्णय नकोत.

कन्या:- धातू संबंधित कामात यश मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. घरात काही बदल कराल.

तुळ:- व्यवसायात वाढ होईल. धार्मिक लेखकांना यश मिळेल. कीर्ती पसरेल.

वृश्चिक:- कुटुंबास अधिक वेळ द्यावा लागेल. विनाकारण वाद होतील. अचानक धनलाभ होईल.

धनु:- धार्मिक यात्रा घडेल. छोटे प्रवास होतील. मेजवानीचे योग आहेत.

मकर:- दिवस सुखात जाईल. मन आनंदी राहील. खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल.

कुंभ:- भौतिक सुखे मिळतील. स्वप्ने साकार होतील. आनंदी राहाल.

मीन:- मौल्यवान खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आनंद निर्माण करण्याऱ्या घटना घडतील. मनासारखी कामे होतील.

 

५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.

व्यवसाय:- वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.

– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *