नाशिक: प्रतिनिधी
तीन हजार रुपयांची लाच घेताना मालेगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडण्यात आले.मालेगाव येथील किल्ला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक तानाजी मोहन कापसे यांनी तक्रारदाराकडे गंभीर गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार सापळा लावण्यात आला असता लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव , पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी ,प्रवीण महाजन,प्रणय इंगळे, संदीप बत्ती परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली,