42 दिवसांपासून होते आजारी
मुंबई: प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ५९ वर्षांचे होते, दीर्घ आजारामुळे. त्यांच्यावर ४२ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते…
गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे,