दिक्षी गावात अवैध दारू आढळल्याने महिला आक्रमक

दिक्षी गावात पुन्हा अवैध दारू सापडल्याने महिला आक्रमक

महिलांचा दुर्गावतात ,  एक तास रस्ता रोको

दिक्षी वार्ताहर

गेल्या महिन्यापासून निफाड तालुक्यातील दिक्षी गावात गावातील आदिवासी महिला आक्रमक झालेल्या दिसत आहे सुरुवातीला महिलांना ओझर पोलीस स्टेशन व दिक्षी ग्रामपंचायत निवेदन दिले पण दारू विक्री करणाऱ्यानी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपले धंदे सुरू ठेवले नंतर महिलांनी अवघ्या पाच दिवसापूर्वी सरकारवाडा हॉटेलवर धाड ठाकली ओझर पोलिस स्टेशनच्या वतीने संबधीत व्यक्तीवर कारवाई पण करण्यात आली तरीही दारू विक्री सुरूच होती .शुक्रवारी सायंकाळी गावातीलच एका वस्तीत एका महिलेच्या घरी पुन्हा एकदा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या त्यांनी थेट अवैद दारू अडङयावर जाऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अनेक वेळा पोलीसांनी छापे मारून सुद्धा दिक्षीतील अवैद्य मद्यविक्री सुरूच असल्याने महिला आक्रमक झाल्या व महिलांनी आपला मोर्चा ओझर सुकेना रस्स्यावर ओळवला आणि ठिय्या आंदोलनच केले पोलीस पाटील विजय गहिले यांनी संबंधि ओझर पोलीस स्टेशनला संपर्क केला नेहमीप्रमाणे उशीराच ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले
यावेळी भाजपचे यतीन कदम देखील अवैध दारू अड्डा बंद करण्यासाठी रास्ता रोको मध्ये महिलांसोबत उतरले. व गेल्या महिन्यापासून महिलांच्या वतीने दिक्षीतील महिला शाळकरी मुले व शेतावर काम करणारे व्यसनाधिन होत असल्याने आंदोलन केले जात आहे तुम्हाला बंदोबस्त का करता येत नाही असा जाब आंदोलन कर्त्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद यतीन कदम यांनी पोलिसांना विचारून चांगलेच धारेवर धरले.त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीना पोलिसांनी अटक केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले परत जर दारू विक्री सुरू दिसली तर आम्ही आंदोलन करणार असल्याचेही उपस्थित महिलांनी सांगितले

ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने दिक्षी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे मात्र राज्य उत्पादक शुल्क यांच्या कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *