लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
सध्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर व फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची मेसेज प्रसारित करुन अफवा पसरवली जात आहे.अशा अफवांमुळे परिसरातील लोकांच्या मनात भीती पसरली असल्याचे निदर्शनास येत आहे.अश्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन लासलगाव पोलिस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी केले आहे
नागरिकांना अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्यास संपर्क साधावा,जर कोणी अशा अफवा पसरवीत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे.बातमीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर असल्या कोणत्याही मेसेजेस अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये.सोशल मीडियाच्या मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.अफवा पसरवणाऱ्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरवल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल.कोणत्याही अफवेला बळी पडून, कोणासही मारहाण करू नका असे कृत्य केल्याने आपल्या हातून गंभीर गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे स पो नि राहुल वाघ यांनी सांगितले आहे.