नाशिक : प्रतिनिधी
पोलीस खात्यातील लाचखोरी थांबण्यास तयार नाही. मालेगाव येथे एक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीला वीस हजारांची लाच मागीतल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पकडले.
तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र दिनांक 3 सप्टेबरला जेवण करुन घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थांशी संबधित आहेत. या कारणावरुन त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात चौकशीला नेण्यात आले होते. कायदेशीर कारवार्ई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्यांच्या मित्रासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आली. तडजोडअंती वीस हजार रुपये निश्चित करण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पथकाने सापळा रचला असता मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशचंद ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम पाटील, खासगी व्यक्ती सय्यद राशीद सय्यद रफिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील,संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांनी सहभाग घेतला.