डिअर बेस्ट फ्रेन्ड !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी स्पेशल मैत्रिण असते. अगदी ह्रदयावर राज्य करणारी,मलाही  अशीच एक मैत्रिण भेटली फर्स्ट इयरच्या वर्गात मैत्री आमची एवढी घट्ट झाली की,अगदी जीवलग मैत्रिणी बनून गेलो. एकमेकींना एवढ ओळखू लागलो की मनातंल ही ओळखू लागलो. एकच विषयावर आम्ही तिन तिन दिवस बोलायचो. मत पटली नाही तर खुप भांडायचो ही आणि समजूनही घ्यायचो. फर्स्ट इयरपासून सुरू झालेला आमचा मैत्रीचा प्रवास लाइफ टाईम असणारा आहे. फर्स्ट इयरच्या वर्गातल्या फर्स्ट बेंचपासून ते एम ए च्या वर्गातील फर्स्ट बेंच पर्यंतच्या तिच्या आठवणी मी अजूनही जपून ठेवल्या आहेत. आमची मैत्री पाण्यासारखी आहे, त्यात कोणताही रंग मिसळू दे उठून दिसणारी.
एवढी गोड मैत्रिण मला मिळाली ना की , तिच्या प्रत्येक यशात मी आनंदाने गहिवरून जायचे, आम्ही दोघी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू !आमच्या दोघींची मैत्री म्हणजे ते गाणं आहे की जे सुरू झाल की थांबूच नये असे वाटते.
माझी बेस्ट फ्रेन्ड मैत्रीच ते पुस्तक आहे जे वाचन असतांना जेवढे वाचत जावे तेवढे तिच्या प्रेमात पडावे. तिने लिहिलेल्या ब्लॉगची तर पूर्ण कॉलेजमध्ये चर्चा असायची.
आपण इतरांशी चांगले वागले की, आपल्या बाबतीतही चांगले घडते. हा तिचे हे स्टेटस  अगदी तिच्या स्वभावाला शोभणारा ती बेस्ट फ्रेन्ड माझी होती. पण इतरही मैत्रिणी सोबत छान राहायची छोट्यातली छोटी गोष्टही आम्ही एकमेंकींना शेअर करायचो. एवढ्या वर्षापासूनची आमची मैत्री अजूनही तशीच आहे.
तिचा कॉल आला की घरात सर्वांनाच खुप आनंद होतो. माझी एकूलती एक बेस्ट फ्रेन्ड म्हणून ती आमच्या घरात खुप फेमस आहे. प्रत्येक सुख दुख:त मला तिची आठवण येते. काही आठवणी नाही विसरता येत . बोलण नाही झाल तरी आठवण काही थांबत नाही. एकमेकींपासून दूर आहोत तरी एकमेकींच्या ह्रदयात राहतोय. शेवटी नशिबातच असावी लागते. अशी मैत्रिण जीवापाड प्रेम करणारी एकमेकींचे वाढदिवस करण्यापासून ते सुख : दुखातही आम्ही एकमेकींची  साथ कधी सोडत नाही. रूसणं, फुगण आमच्या मैत्रित कधी झालंच नाही. प्रेमळ ती आणि आमची मैत्रि अतंराने कधी दुरावलो नाही . काही नाती रक्ताची नसतात. ती ह्रदयातून जन्माला येतात. आणि मनाच्या  कोपर्‍यात घर करून राहतात. अगदी कायमची आयुष्यात सगळ्यात सुंदर काय असेल तर माझी तुझ्याशी असलेली मैत्री.जास्त काहीच नको मला फक्त आपली मैत्री अशीच फुलत राहू दे. माझ्या आयुष्यातील एक  खास मैत्रिण म्हणजे माझी बेस्ट फ्रेन्ड. आमची मैत्री लाइफ टाइम अशीच राहू दे हीच प्रार्थना करते मी.

राधिका गांगर्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *