एनडीएसटीत प्रगतीच, परिवर्तनला अवघी एक जागा
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलने सत्ता राखण्यात यश मिळविले. प्रगती पॅनलच्या 20 उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले तर विरोधी परिवर्तन पॅनलचे संग्राम करंजरकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले.
परिवर्तनाच्या अपेक्षेने रिंगणात उतरलेल्या माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे, संग्राम करंजकर व शिक्षक भारतीचे के.एन. अहिरे, के. के. अहिरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला अवघी एक जागा मिळाली. तर टीडीएफ डीसीपीएस पॅनललाही शिक्षक सभासदांनी नाकारले. शनिवारी एनडीएसटीच्या 21 जागांसाठी जिल्ह्यात 86 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी प्रगती पॅनलीविरोधात परिवर्तन आणि टीडीएफ-डीसीपीएस या दोन पॅनलने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यातही आर.डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला 21 पैकी अवघ्या बारा जागांवरच उमेदवार मिळाले होते. मागील दोन महिन्यापासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. दोन महिन्यांपूर्वी निवडणूक अवघ्या एक दिवसांवर आली असतानाच शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, नुकतीच सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे ठरल्याने शनिवारी एनडीएसटीसाठी मतदान झाले. रविवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासून प्रगती पॅनलचे उमेदवार आघाडीवर राहिले.
प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी मतमोजणीच्या बाहेरील मैदानातून हळूहळू काढता पाय घेतला. विजयानंतर प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:
कळवण- देवळा- सुरगाणा
शांताराम देवरे (4356, विजयी)
दिंडोरी – विलास जाधव (3648)
ज्ञानेश्वर ठाकरे (3956)
सटाणा : संजय देसले (4791)
त्र्यंबक- दीपक व्याळीज (4693)
निफाड : समीर जाधव (4584)
नांदगाव : अरुण पवार (4856)
सिन्नर : दत्तात्रेय आदिक (4541)
इगतपुरी : बाळासाहेब ढोबळे (4538)
येवला : गंगाधर पवार (3887)
नाशिक : निंबा कापडणीस (4076)
सचिन पगार (3733)
संग्राम करंजकर (3443, परिवर्तन)
मालेगाव : संजय वाघ (3983)
विमुक्त जाती जमाती: मोहन चकोर
इतर मागास प्रवर्ग
अनिल देवरे (4100)