थंडी चाहूल अन तापमानात घट

नाशिक:प्रतिनिधी
दिवाळीनंतर शहरात थंडीची चाहूल लागली आहे.  मागील आठवड्यापासून किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या   आठवड्यापासून गारवा जाणवू लागला आहे. गेल्या आठवडाभरातील तापमान पाहता दिवसागणिक तापमानात उतार होत आहेत. परिणामी थंडीचा कडाका वाढला आहे.
दरवर्षीच राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये होते. त्यामुळे यंदा नाशिकचे तापमान किती कमी होते आणि शहरातील किती अंश पर्यंत तापमान कमी होऊन  नवीन उच्चांक गाठते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.    नोव्हेंबर महिन्यापासून लागत असलेली थंडी ही  डिसेंबर, जानेवारीमध्ये अधिकच तीव्र होते. यंदाही असेच चित्र असून, तापमानात घट व थंडीत वाढ होत आहे. दिवाळीनंतर थंडीत वाढ झाल्याने शहरात अल्हाददायक वातावरण आहे. शहरात कालचे किमान तापमान 13.3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस इतके आहे.शहरात अचानक थंडी वाढल्याने   सर्दी,ताप,खोकल्याच्या रूग्णात  वाढ झाली आहे. पण थंडीचा कडाका वाढल्याने  नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.जाॅगिग ट्रॅकवर वाढती गर्दी
सकाळ आणि संध्याकाळच्या गुलाबी थंडीचा आनंद घेत जाॅगिंगला जाणार्याची संख्या वाढली आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसात जाॅगिंग ट्रॅक गर्दीने फुलले आहेत.

मागील दोन दिवसातील तापमान
किमान  कमाल
30 ऑक्टोबर 13.3       30.7
29 ऑक्टोबर 13.6        29.0

News by,,,, अश्विनी पांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *