सुनील कडासने, उपायुक्त अमोल तांबे, खरात यांची बदली
नाशिक : प्रतिनिधी
शासनाने आज पोलीस उपायुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर येथे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय उपायुक्त अमोल तांबे यांची पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. उपायुक्त विजय खरात यांची सहायक पोलीस महानिरीक्षक दक्षता पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर शर्मिष्ठा वालावलकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मालेगावचे अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची नाशिकमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
शासनाने आज या बदल्यांचे आदेश काढले.
नाशिक : गुन्हे अन्वेषन विभागाच्या अधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे इप्पर मंचक ज्ञानोबा यांची शासनाने नियुक्ती केली आहे. शासनाने आज बदल्यांचे आदेश काढले. त्यांची अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.