शिवसेना शिंदे गट महिला महानगर प्रमुख*.अस्मिता देशमाने
नाशिक- बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षपदी तरुण,तडफदार तसेच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत तत्पर असलेल्या अस्मिता देशमाने यांची नियुक्ती झाली.असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शिंदे गटाचे पक्ष संघटन वाढविणे तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवून पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी आता सौ.अस्मिता देशमाने यांच्यावर येऊन पडली आहे.आपण आपल्या पदाला पुरेपूर न्याय देऊन पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू,असे सौ. अस्मिता देशमाने यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
सौ.अस्मिता देशमाने या मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत तसेच मराठा क्रांतीसमन्वयक म्हणूनही धुरा सांभाळली आहे.महिलांच्या न्याय्य हक्कासाठी त्या सातत्याने लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत त्या स्वस्थ बसत नाहीत. महिला सक्षमीकरणावर त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांत व्याख्याने दिली आहेत
सौ.अस्मिता देशमाने यांच्या नियुक्तीचे खा.हेमंत गोडसे,शिंदे गटाचे महानगराध्यक्ष बंटी तिदमे,जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले,ग्रामिण जिल्हा अध्यक्ष भाउलाल तांबडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.लक्ष्मीताई ताठे,मंगलाताई भास्कर,यांच्या मार्गदर्शखाली सौ.अस्मिता देशमाने पक्षवाढिच काम नाशिक शहरात करणार आहेत.