महाराष्ट्राला सांस्कृतिक राजधानी करण्याचा संकल्प : ना.सुधीर मुनगंटीवार

61 व्या राज्यनाट्य स्पर्धेचे  उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी आहे. आपण  सर्वांनी  मुंबई  ,महाराष्ट्राला सांस्कृतिक राजधानी करण्याचा संकल्प करूयात असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते ऑनलाईन माध्यमातून  राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी झाले होते .यावेळी त्यांनी रंगकर्मीच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून नाट्यकर्मींच्या अनेक प्रश्नावर  सकारात्मक विचार सुरू असून नाट्यकर्मीच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कलावंताचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे   त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या  प्राथमिक फेरीचे काल  (दि.17)रोजी प.सा नाट्यगृह येथे  उद्घाटन होणार झाले. यावेळी नाट्यपरिषद अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम , प्रा.दिलीप फडके,सुनिल ढगे ,मीना  वाघ    ,मंगेश नेहरे, विश्वास पांघरकर , किरण कुमार आडकमोल ,राजेश जाधव  यासह आदि मान्यवर उपस्थित  होते.
प्रा.रविंद्र कदम यांनी यावेळी राज्य नाट्य स्पर्धा  स्पर्धक आणि रसिकांना हुरहुर  लावणारी असते.
नाशिक शहरात नाट्यकर्मीची मोठी नाट्य चळवळ आहे. यंदा राज्यात नाशिक केंद्रावर सर्वाधिक नाटक सादर होत आहेत. 28 नाटकातून  हजारहून जास्त कलावंत आपली कला सादर करणार आहेत.राज्य नाट्य स्पर्धेतून रंगकर्मी घडत असतो असे अध्यक्षीय मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा.दिलीप फडके यांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असतानाच पसा नाट्यगृहाच्या दूरावस्थेबद्दल  भाष्य करत असताना कलावंताना पुढच्यावेळी नाटक करताना नाट्यगृहाचा चेहरा मोहरा बदललेला असेल असे भाष्य केले.
काल  पहिल्या दिवशी सुरभी थिएटर नाशिकचे विठ्ठला हे नाटक सादर झाले.   नाटकाचे लेखन विजय तेंडुलकर ट यांनी केले आहे तर दिग्दर्शन राजेश शर्मा यांनी केले.
नाटकात भुताची गोष्ट मांडण्यात आली आहे. पण हे भूत माणसांसारख आहे.त्यालाही माणसारखी आकांक्षा आशा आहे.  माणूस सतत कोणत्या ना कोणत्या आशेवर जगत असतो आणि भुताला जर एखादी आशा असेल तर हेच या नाटकातून दाखवण्यात आले  आहे. नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे . त्यामुळे ते बहारदारच आहे.  नाटकात सतत घडणाऱ्या उत्सुकतापूर्ण घटनांमुळे रसिक नाटकाला खिळून राहतात. कलावंतानीही उत्तम अभिनय केला आहे. नाटकाचे नेपथ्य  शैलेंद्र गौतम ,प्रकाशयोजना विनोद राठोड, संगीत मधुरा तरटे ,रंगभूषा माणिक कानडे ,वेशभूषा संतोष झेंडे, रंगमंच व्यवस्था विक्रम गवांदे ,शुभम शर्मा ,नाटकात नयना सनासे , मयूर चोपडे ,निशा चव्हाण ,सम्राट सौंदांणकर,   संजय गंगावणे, भारतसिंग परदेशी, यशवंत भालेराव ,अनिल विरकर ,जॉकी ठाकरे, ललित बत्तासे ,परिस्पर्श बतासे, नंदू परदेशी, प्रियंका सिंग ,स्वाती संगमनेरे , रेखा देशपांडे यांनी अभिनय केला.
तरी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी नाटक पाहण्यास उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वतीने करण्यात आले आहे.
आज सादर होणारे नाटक : सुमेध बहुउद्देशीय संस्था जळगाव शाखा नाशिक,- साधूसंत येती घरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *