नाशिक :प्रतिनिधी
शहरात गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या नामांकित महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गौरव बोरसे (वय 21) हे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.तो बीकाॅमच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. प्राथमिक माहितीनुसार गौरव बोरसे याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे.